राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम
उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस उपअधीक्षक, नायब तहसीलदार, कक्ष अधिकारी व तत्सम पदांसाठी महाराष्ट्र्र लोकसेवा आयोग जी परीक्षा घेते त्याला राज्यसेवा परीक्षा असे म्हणतात.
एमपीएससी [राज्यसेवा] परीक्षेचे स्वरूप
ही परीक्षा खालील प्रकारे ३ टप्प्यांमध्ये घेण्यात येते.
१. राज्य सेवा [पूर्व] परीक्षा ४०० गुण
२. राज्यसेवा [मुख्य] परीक्षा ८०० गुण
३. मुलाखत १०० गुण
परीक्षेसाठीची अर्हता
वयोमर्यादा – साधारण प्रवर्गासाठी किमान १९ व कमाल ३३ वर्षे आयोगाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या तारखेपर्यंत. उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिलक्षम – [१] महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत ५ वर्षांपर्यंत. [२] अपंग उमेदवारांच्या बाबतीत ४५ वर्षांपर्यंत. [३] पात्र खेळाडूंच्या बाबतीत ५ वर्षांपर्यंत. [४] माजी सैनिक/ आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी यांचेसाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्षांपर्यंत.
शैक्षणिक – [१] मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली समतूल्य अर्हता. [२] सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब पदाकरिता भौतिकशास्त्र व गणित या विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी या शाखेतील पदवी [३] मराठीचे ज्ञान आवश्यक.
1.राज्यसेवा [पूर्व] परीक्षा अभ्यासक्रम
पेपर क्र. गुण कालावधी दर्जा माध्यम पेपरचे स्वरूप
१. [अनिवार्य] २०० २ तास पदवी मराठी आणि इंग्रजी वस्तुनिष्ठ
२. [अनिवार्य] २०० २ तास घटक क्र. मराठी आणि इंग्रजी वस्तुनिष्ठ
पेपर क्र.१
१. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या प्रचलित घडामोडी.
२. भारताचा इतिहास [महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह] आणि भारताची स्वातंत्र्य चळवळ.
३. महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल – महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल
४. महाराष्ट्र आणि भारत-राज्यव्यवस्था आणि शासन-राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, नागरी शासनव्यवस्था, सार्वजनिक धोरण, हक्क संदर्भातील मुद्दे इ.
५. आर्थिक आणि सामाजिक विकास-शाश्वत विकास, दारिद्र्य, सर्वसमावेशकता, लोकसंख्या अभ्यास, सामाजिक सेवा धोरणे इत्यादी.
६. पर्यावरणविषयक सामान्य मुद्दे – परिस्थितिकी, जैववैविध्य आणि हवामान बदल [विषयाच्या विशेषीकृत अभ्यासाशिवाय]
७. सामान्य विज्ञान
पेपर क्र. १ चा अभ्यास कसा कराल ?
वरील अभ्यासक्रमाला अनुसरून उमेदवाराने खालील पुस्तके घ्यावीत.
१. अ) भारताचा इतिहास – बी.ए.ची पुस्तके
ब) आधुनिक भारताचा इतिहास – नाथे प्रकाशन
क) इतिहास – ८ वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके
२. महाराष्ट्र्र, भारत आणि जगाचा भूगोल
अ) ६ वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके
ब) भूगोल – नाथे प्रकाशन
३. भारतीय राज्यव्यवस्था
अ) ८ वी ते १० वी ची पाठ्यपुस्तके
ब) भारतीय राज्यघटना – घांगरेकर
क) भारतीय राज्यघटना व पंचायतराज – नाथे प्रकाशन
४. सामान्य विज्ञान
अ) ७ वी ते १० वी ची पाठ्यपुस्तके
ब) सामान्य विज्ञान - नाथे प्रकाशन
५. आर्थिंक, सामाजिक विकास आणि पर्यावरण
यासाठी उमेदवाराने पदवी स्तरावरील भारतीय अर्थव्यवस्था आणि भूगोलाची पुस्तके वाचावीत.
वरील अभ्यासक्रमत रूची निर्माण होण्यासाठी उमेदवाराने नियमित सह्याद्रीवरील बातम्या, दूरदर्शनवरील बातम्या आणि कोणतेही एका प्रादेशिक वृत्तपत्राचे संपादकीय वाचावे. पाठ्यपुस्तकाचे तीन चार वेळ वाचन झाल्यानंतरच उमेदवाराने अभ्यासक्रमानुसार तयार केलेली पुस्तके वाचावित. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना नेहमी एक बाब लक्षात ठेवावी, ती म्हणजे सुरूवातीला प्रत्येक विषयाची बेसिक माहिती पक्की करण्याचा उमेदवाराने प्रयत्न करावा. एकदा बेस पक्का झाला की मग तुम्ही कोणताही संदर्भ ग्रंथ हाताळला तरी तो अभ्यासायला कठीण जात नाही. खूप चालू घडामोडींची पुस्तके वाचण्यापेक्षा उमेदवाराने डेली न्यूज, डेली वृत्तपत्र आणि ‘रोजगार नोकरी संदर्भ’ यातूनच टिपणं काढण्याचा प्रयत्न करावा. हे सर्व करीत असताना विचारलेल्या प्रश्नपत्रिकांचं उमेदवाराने आवर्जून वाचन करावं. विचारलेल्या प्रश्नपत्रांचं दोन तीन वेळा वाचन झालं की त्याच प्रश्नपत्रिका सरावासाठी वापराव्यात. जे प्रश्न दोन तीन वेळा वाचलेत त्याच प्रश्नांवर आपण जेव्हा सराव करतो तेव्हा प्रत्यक्षात आपल्याला किती गुण पडतात याची माहिती होते आणि अभ्यासाला प्रेरणा मिळते.
पेपर क्र.२
१. उता-यावरील प्रश्न [आकलन]
२. संवाद कौशल्यासह आंतरवैयक्तिक कौशल्ये.
३. अनुमानात्मक चाचणी आणि विश्लेषणात्मक क्षमता.
४. निर्णय प्रक्रिया आणि समस्या सोडवणूक
५. सर्वसामान्य बुद्घीमत्ता चाचणी
६. मूलभूत अंकगणित [संख्या, संख्यात्मक संबंध, घातांक इ.] – [दहावी] सामग्री विश्लेषण [तक्ते, आलेख, टेबल, सामग्रीचा पुरेसेपणा इ.] – [दहावीचा स्तर]
७. मराठी आणि इंग्रजी भाषेतील उता-यावरील आकलनात्मक कौशल्ये [दहावी/बारावी स्तर]
टीप १. मराठी आणि इंग्रजी भाषेतील कौशल्य चाचणी करण्यासाठीचे प्रश्न अनुक्रमे मराठी आणि इंग्रजी भाषेतच असतील आणि त्यांचे भाषांतरित उतारे उपलब्ध नसतील.
टीप २. 1 ते 5 घटक पदवी स्तरीय असतील.
टीप 3. प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतील.
टीप 4. राज्यसेवा [पूर्व] परीक्षेच्या दोन्ही पेपरची उपस्थिती मूल्यांकनाच्या हेतूच्या दृष्टीने अनिवार्य आहे. म्हणून उमेदवार दोन्ही पेपरला उपस्थित नसेल तर अपात्र ठरेल.
अभ्यास कसा कराल ?
खरे पाहता पेपर ५.२ मध्येच या विषयातच पूर्व परीक्षा उत्तीर्ण करता येईल एवढी क्षमता आहे. सायन्सच्या तथा बॅंक, निवड मंडळांच्या परीक्षेची कसून तयारी करणा-या उमेदवारांना हा विषय सोपा जातो. फार कमी अभ्यासात खूप अधिक गुण मिळवून देणारा हा पेपर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयाकडे दुर्लक्ष करू नये. यातील अर्धेअधिक प्रश्न हे उत्ता-याशी संबंधितच असतात. अनेकांचा असा गैरसमज असतो की उतारा वाचला की लगेच उत्तरे देता येतात.
उमेदवारांनी लक्षात घ्यावे, जो विषय सोपा असतो त्याच विषयात अधिकाधिक गुण मिळविण्याची रणनीती तुम्ही आखली पाहिजे. म्हणून उता-यावरील प्रश्न सोडविण्याचा चांगला सराव करा. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही बॅंक किंवा एमपीएससी पूर्व व मुख्य परीक्षांचे प्रश्न सोडून पाहण्याचा सराव करावा, अर्थातच त्या प्रश्नांचे स्वरूप दिलेल्या अभ्यासक्रमानुसार असावे.
या पेपरच्या विचारलेल्या प्रश्नपत्रिका प्रत्येकाकडे असायलाच हव्यात. त्यानुसारच तुम्ही बॅंक व तत्सम परीक्षांत विचारलेल्या प्रश्नांवर सराव करावा.
या पेपरमध्ये १० टक्क्यांपर्यंत गुण सहजासहजी मिळविता येतात. त्यासाठी आपण सुरूवातीला योग्य अभ्याससाहित्याची जुळवाजुळव आणि भरपूर सराव करणे गरजेचे आहे.
2. राज्यसेवा [मुख्य] परीक्षाः स्वरूप
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा – २०१२ साठीच्या सुधारित अभ्यासक्रमामध्ये सहा अनिवार्य विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
विषय गुण स्वरूप परीक्षेसाठीचा वेळ
मराठी १०० पारंपरिक ३ तास
इंग्रजी १०० पारंपरिक ३ तास
सामान्य अध्ययन - १ १५० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी २ तास
सामान्य अध्ययन - २ १५० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी २ तास
सामान्य अध्ययन - ३ १५० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी २ तास
सामान्य अध्ययन - ४ १५० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी २ तास
एकूण ८००
सामान्य अध्ययनसाठीच्या सर्व म्हणजे चारही पेपर्सचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असे असून ह्यासाठी [३: १] ह्या प्रमाणात नकारात्मक गुणपद्धती स्वीकारण्यात आली आहे. मुख्य परीक्षेच्या सर्वच् म्हणजे सहाही पेपरमध्ये स्वतंत्रपणे पास होणे अनिवार्य आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी पास होण्याची पात्रता ४५ टक्के इतकी आहे तर आरक्षित प्रवर्गासाठी पात्रता ४० टक्के इतकी आहे.
पेपर – 1 पेपर – 2
मराठी अनिवार्य १०० गुण वेळ ३ तास इंग्रजी अनिवार्य १०० गुण वेळ ३ तास
१. लेखन घटक 1. Essay
२. आकलन 2. Letter Writing
३. व्याकरण 3. Communication Skills
4. Precis Writing
5. Compreshension
6. Paraphrase of Prose Passage
7. Grammar
सामान्य अध्ययन १ गुण – १५० वेळ २ तास
[अ] इतिहास
१. आधुनिक भारताचा [१८१८-१८५७] महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह अभ्यास
२. भारतामधील ब्रिटिश सत्तेची स्थापना.
३. सामाजिक – सांस्कृतिक बदल
४. सामाजिक – आर्थिक जागृती
५. भारतीय राष्ट्रवादाचा उगम आणि विकास
६. गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ
७. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारत
८. महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक [त्यांची विचारसरणी आणि कार्य]
९. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा [प्राचीन ते आधुनिक]
[ब] भूगोलः महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह
१. प्राकृतिक भूगोल
२. महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल
३. महाराष्ट्राचा मानवी आणि सामाजिक भूगोल
४. पर्यावरण भूगोल
५. लोकसंख्या भूगोल [महाराष्ट्र्राच्या विशेष संदर्भासह]
६. सुदूर संवेदन
[क] भूगोल आणि कृषी
१. कृषी परिस्थितिकी
२. हवामान
३. मृदा
४. जल व्यवस्थापन
सामान्य अध्ययन २ गुण – १५० वेळ २ तास
भारतीय राज्यघटना आणि भारतीय राजकारण [महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह] आणि कायदे
१. भारताची राज्यघटना
२. राजकीय व्यवस्था [शासनाची रचना, अधिकार आणि कार्ये]
३. राज्यशासन आणि प्रशासन [महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह]
४. जिल्हा प्रशासन
५. ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन
६. शिक्षण व्यवस्था
७. पक्ष आणि दबाव गट
८. प्रसारमाध्यमे
९. निवडणूक प्रक्रिया
१०. प्रशासकीय कायदे
११. केंद्र आणि राज्य शासनाचे विशेषाधिकार
१२. काही महत्त्वाचे कायदे
१३. समाजकल्याण आणि सामाजिक कायदे
१४. सार्वजनिक सेवा
१५. सार्वजनिक खर्चावरील नियंत्रण
सामान्य अध्ययन ३ गुण – १५० वेळ २ तास
मानवी साधनसंपत्तीचा विकास आणि मानवी हक्क
[अ] मानवी साधनसंपत्तीचा विकास
१. भारतातील मानवी साधन संपत्तीचा विकास
२. शिक्षण
३. व्यावसायिक शिक्षण
४. आरोग्य
५. ग्रामीण विकास
[ब] मानवी हक्क
१. मानवी हक्कांची वैश्विक सनद
२. बाल विकास
३. महिला विकास
४. युवक विकास
५. आदिवासी विकास
६. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गाचा विकास
७. वृद्घ कल्याण
८. कामगार कल्याण
९. विकलांग व्यक्तींचे कल्याण
१०. पुनर्वसन
११. आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना
१२. ग्राहक संरक्षण
१३. मूल्ये आणि नैतिकता
सामान्य अध्ययन ४ गुण – १५० वेळ २ तास
[अ] अर्थव्यवस्था आणि नियोजन
१. भारतीय अर्थव्यवस्था
२. ग्रामीण आणि नागरी पायाभूत संरचना विभाग
३. उद्योग
४. सहकार
५. आर्थिक – सुधारणा
६. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल संचार
७. दारिद्र्य मोजणी आणि अंदाज
८. रोजगार निर्मिती निश्चित करणारे घटक
९. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
[ब] विकासाचे अर्थशास्त्र आणि कृषी
१. समग्रलक्षी अर्थशास्त्र
२. सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था
३. वृद्घी, विकास आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र
४. भारतीय कृषी, ग्रामीण विकास आणि सहकार
५. कृषी
६. अन्न आणि पोषण
७. भारतीय उद्योग पायाभूत सुविधा व सेवा क्षेत्र
[क] विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास
१. ऊर्जा
२. संगणक आणि माहिती – तंत्रज्ञान
३. अवकाश – तंत्रज्ञान
४. जैव तंत्रज्ञान
५. भारताचे आण्विक धोरण
६. आपत्ती व्यवस्थापन
No comments:
Post a Comment