मित्रानो आजकाल वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे गाडी कुठे तरी जावे आणि येऊन पाहिलं तर गाडी गायब असं खूप जनाबरोबर झालं असेल इतकी मेहनत करून गाडी घ्यायची आणि चोरांना द्याची आणि पुलिस स्टेशन ला फेऱ्या मारत बसायचं पण आता यातील थोडाफार तरी तुमचा त्रास कमी होणार कारण आता तुम्ही वाहन चोरीला गेल्याची तक्रार घर बसल्या आपल्या फोन वरून नोंदउ शकता
तक्रारदार घरी बसून, सायबर कॅफे अथवा भ्रमणध्वनीवरून विनाशुल्क या अॅप्लिकेशनचा लाभ घेऊ शकतो.
अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करत पोलीसही नागरिकांशी संवाद साधण्याचा, त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यास तत्पर होत आहे. पोलीस महासंचालकाच्या संकल्पनेतून सामान्य नागरिकांना वाहन चोरीविषयी तक्रार नोंदविण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने ‘वाहन चोरी तक्रार’ नावाचे पोर्टल सुरू केले आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून याद्वारे नागरिकांना आपल्या वाहन चोरीची तक्रार घरबसल्या करता येईल.
आपल्या वाहन चोरीबाबत पोलिसांचा काय तपास सुरू आहे याचा तपशील मिळवू शकतो. यासाठी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने सुरू केलेल्या पोर्टलवर जाऊन प्रथम नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर ओळख पटवण्यासाठी (ओटीपी) संकेतशब्द नोंदविलेल्या भ्रमणध्वनी अथवा ई मेलवर येईल तो संकेतशब्द बॉक्समध्ये भरून नोंदणी पूर्ण करावी. नोंदणी झाल्यानंतर नोंदविलेला भ्रमणध्वनी, हरवलेला संकेतशब्द आणि व्हॅरिफिकेशन कोड टाकून लॉगीन करता येईल. ही प्रक्रिया झाल्यावर जे वाहन हरविले किंवा चोरीस गेले त्याबाबत तक्रार देऊ शकतात. तक्रार नोंदवतांना वाहनाचा प्रकार, वाहन कंपनी, वाहनाचा आरटीओ नोंदणी क्रमांक, चेसिज क्रमांक, इंजिन क्रमांक, निर्मिती वर्ष, गाडीचा प्रकार,वाहनाचा रंग, वाहन ज्या ठिकाणाहून चोरीस गेले, त्या ठिकाणचे नाव, जिल्हा, चोरी गेल्याचा कालावधी आदी तपशील द्यावा लागेल. आपली तक्रार पोर्टलवर नोंदवल्यानंतर ती हा प्रकार ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला, तिकडे वर्ग होईल. या सुविधेचा नागरिकांनी वाहन चोरीच्या तक्रारी नोंदवण्यासाठी वापर करावा, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.
ऑनलाइन नोंदणी कशी कराल?
’ वाहनचोरीतक्रार डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन तेथे पब्लिक लॉगिन पर्याय निवडून नोंदणी टॅब वर जावे लागेल.
’ स्वतचा भ्रमणध्वनी क्रमांक, इ मेल आयडी देऊन आधारकार्ड क्रमांक, स्वतचे नाव, स्वतचा संकेतशब्द ठरवून नोंदणी करता येईल.